12 वी चा निकाल लागला आणि एकमेव तृतीयपंथी सेजलचाही, 62 टक्के गुण मिळवत केलं यश संपादन

12 वी चा निकाल लागला आणि एकमेव तृतीयपंथी सेजलचाही, 62 टक्के गुण मिळवत केलं यश संपादन

| Updated on: May 28, 2023 | 10:20 AM

आपण 10, 12 वीत शिकत असताना एखादा चालताना जरा निसटला की मग बाई म्हणून हिनवतो येथे तर तृतीयपंथीच मग नुसता थट्टा आणि मस्करी. मग तिचे शिक्षण कसे होईल? पण तिने आपला शिक्षणाचा हट्ट सोडला नाही.

नांदेड : आपल्याकडे आजुबाजूला आपले अनेक मित्र असतात. त्यात काही मुलं तर काही मुली. पण तृतीयपंथी कोणाचे असतात का? आपण 10, 12 वीत शिकत असताना एखादा चालताना जरा निसटला की मग बाई म्हणून हिनवतो येथे तर तृतीयपंथीच मग नुसता थट्टा आणि मस्करी. मग तिचे शिक्षण कसे होईल? पण तिने आपला शिक्षणाचा हट्ट सोडला नाही. कॉलेज किंवा खाजगी क्लासेसच्या मदतीशिवाय नांदेडमध्ये एका तृतीयपंथीयाने बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलय. तृतीयपंथी असलेल्या सेजल पवारने लोक चिडवतात तसेच आपली थट्टा करतात म्हणून घरातच बसून अभ्यास केला. बारावीची परीक्षा दिली. आणि वाट पाहिली त्या निकालाची. निकालाचा दिवस उजाडला. तिच्यासह परिवार आणि परिसरातील अनेकांचं लक्ष त्याकडे लागलं होतं. पण मेहनत करणाऱ्याला यश येतच. या परीक्षेत तिने 62 टक्के गुण मिळाले आहेत. नांदेडमध्ये बारावीच्या परीक्षेत यश मिळवणारी सेजल ही एकमेव तृतीयपंथी असून तिच्या या यशाचे कौतुक होतंय

Published on: May 28, 2023 10:20 AM