कुणीही यावं, लोकसभा निवडणूक माझ्यासाठी वन वे. प्रतिस्पर्धीच नाही, 'या' खासदाराचा मोठा दावा

कुणीही यावं, लोकसभा निवडणूक माझ्यासाठी वन वे. प्रतिस्पर्धीच नाही, ‘या’ खासदाराचा मोठा दावा

| Updated on: Oct 08, 2023 | 11:34 PM

राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी जी कामे करायला पाहिजे होती ती कामे मीच पूर्ण केली. संसदमध्ये बोलण्यापेक्षा माझ्या मतदारसंघातील कामे किती पूर्ण केली किती विकासकामे केली हे सुप्रिया सुळे यांनी पहावे. माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार किंवा सुप्रिया सुळे कोणीही लढाई लढावी. माझी तयारी आहे.

पंढरपुर : 8 ऑक्टोबर 2023 | शरद पवार जर माढ्यातून लढणार असते तर मला खूप आनंद झाला असता. परंतु पवार माढ्यातुन लढणार नाहीत अशी घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यामुळे भविष्यात मला माढा लोकसभा वन वे आहे, असा दावा खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी केलाय. सध्या माढा लोकसभेतुन मला कोणीही प्रतिस्पर्धी दिसत नाही असेही ते म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्टीचे ए .एस म्हणजे अमित शहा यांनी खच्चीकरण केल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, भाजप नेते अमित शहा यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नॅनो पार्टी केलीय आणि जी भाजपा नॅनो पार्टी होती ती आता जगात मोठी पार्टी झाली आहे.

Published on: Oct 08, 2023 11:34 PM