कोकणात जाणाऱ्यां-येणाऱ्यांनो जरा थांबा! ‘या’ घाटात वाहतुकीला फटका; पहिल्याच पावसात रस्त्यावर…
मागील तीन एक वर्षांपासून या राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. असेच काम परशुराम घाटातही सुरू असून येथील कांक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तेथील एका लेनचे काम पुर्णत्वेकडे जात आहे. तर आता थोडेच काम शिल्लीक आहे. तेही येत्या काही दिवसात पुर्ण होईल.
चिपळूण : कोकणात जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा अतिशय चांगला आणि महत्वाचा आहे. त्यासाठीच मागील तीन एक वर्षांपासून या राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. असेच काम परशुराम घाटातही सुरू असून येथील कांक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तेथील एका लेनचे काम पुर्णत्वेकडे जात आहे. तर आता थोडेच काम शिल्लीक आहे. तेही येत्या काही दिवसात पुर्ण होईल. मात्र आता मान्सूनने हजेरी लावली असून कोकणात पोवसाचा जोर वाढला आहे. याचाच फटका परशुराम घाटातील वाहतुकीवर होताना दिसत आहे. येथे पहिल्याच पावसात चिखल माती महामार्गांवर आल्याने प्रवास धोकादायक बनला आहे. ज्यामुळं जीव मुठीत घेऊन वाहनचालकांचा घाटातून प्रवास सुरू आहे. तर अपूर्ण कामाचा फटका हा वाहतुकिस बसला असून वाहतूक संथ गतीने सुरु आहे. तर मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची प्रतिक्रिया वाहन चालक देत आहेत.