देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ पोपटाचे भविष्य
राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात केंद्रीय नेते सातत्याने येत आहेत. दोन दोन दिवस राहून तिथली तयारी बघत आहेत. लोकांना भेटत आहेत. त्यामुळे बारामतीमध्ये त्यापेक्षा काही वेगळं नाही. विरोधकांची वज्रमूठ सभा हा एक प्रयोग आहे.
पुणे : आगामी लोकसभा निवडणूक आम्ही ताकदीने जिंकू. त्यानंतर अधिक काम करून विधानसभेच्या निवडणुका ही प्रचंड ताकदीने जिंकू. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात केंद्रीय नेते सातत्याने येत आहेत. दोन दोन दिवस राहून तिथली तयारी बघत आहेत. लोकांना भेटत आहेत. त्यामुळे बारामतीमध्ये त्यापेक्षा काही वेगळं नाही. विरोधकांची वज्रमूठ सभा हा एक प्रयोग आहे. त्या प्रयोगामधल्या नेत्यांबद्दल पवार साहेबांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे. त्यापेक्षा वेगळ काही सांगण्याची आवश्यकता नाही. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला आता पूर्ण समजले आहे की पोपट मेला आहे. तो मान हलवत नाही. हात पाय हलवत नाही. पण त्यांना काही गोष्टी बोलावया लागतात. कारण त्यांना त्यांच्या लोकांना संदेश द्यावा लागतो. त्यांच्या लोकांनाही सांगावं लागतं काही तरी आशा जिवंत आहे. विधानसभा अध्यक्ष कायदेशीर निर्णय घेतील. कायद्याचा अभ्यास करणारे असे ते विधानसभा अध्यक्ष आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.