गाडीत तो मागच्या सीटवर झोपला होता, दुर्गंधी सुटली, पोलिसांनी लॉक उघडले आणि…
गाडीच्या मागच्या सीटवर एक व्यक्ती झोपली होती. बराच वेळ झाला तरी त्या व्यक्तीची काही हालचाल होत नव्हती. पोलिसांनी गाडीचे लॉक तोडले. त्या व्यक्तीला ससून रुग्णालयात दाखल केलं.
पुणे | 6 नोव्हेंबर 2023 : पुणे पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक विचित्र घटना घडली. हडपसर पोलीस स्टेशन समोर एक बंद गाडी उभी होती. त्या गाडीच्या मागच्या सीटवर एक व्यक्ती झोपली होती. बराच वेळ झाला तरी त्या व्यक्तीची काही हालचाल होत नव्हती. काही वेळाने त्या गाडीतून दुर्गंधी येऊ लागली. पोलीसानी दुर्गंधी येणाऱ्या गाडीत पाहिले. दुर्गंधी जास्त येत असल्याने पोलिसांनी गाडीचे लॉक तोडले. गाडीची तपासणी केली. त्यावेळी सदर व्यक्ती हा झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी तातडीने त्या व्यक्तीला ससून रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेची हडपसर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली. सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. सतीश प्रभू कांबळे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी तो ज्या गाडीत सापडला ती व्हॅगनार गाडी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.