'मुडदा गाडणाऱ्याला रेवडीवाला भेटला', आमदार रवींद्र धंगेकर यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांना टोला

‘मुडदा गाडणाऱ्याला रेवडीवाला भेटला’, आमदार रवींद्र धंगेकर यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांना टोला

| Updated on: Oct 12, 2023 | 10:45 PM

ललित पाटील प्रकरणी सरकारने नेमलेल्या समितीवर आमचा विश्वास नाही. ही समिती दरोडेखोरांची टीम आहे. पंधरा दिवसात समिती अहवाल देणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचीच चौकशी सुरु आहे. मुडदा गाडणाऱ्याला रेवडीवाला भेटला अशी परिस्थिती आहे, , असा टोलाही त्यांनी लगावला.

पुणे : 12 ऑक्टोबर 2023 | पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून पलायन केलेल्या ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे. सरकारच्या वैद्यकीय विभागाने चार सदस्य समिती नेमली आहे. मात्र, या समितीला कॉंग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी विरोध केलाय. ललित पाटील ससूनमध्ये ज्या पद्धतीने रहात होता. ते पहाता त्याचे अधिकारी यांच्याशी संबध आहेत. त्यामुळे या समितीवर माझा आणि कुणाची विश्वास नाही. पुण्याला कलंक लावण्याचे काम ललित पाटील याने केले. आतापर्यंत सरकारने चार, पाच डॉक्टरांना निलंबित करयला हवे होते. पण सरकार गप्प आहे अशी टीका आमदार धंगेकर यांनी केली. या ड्रग्ज प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधिश यांच्यामार्फत चौकशी करा. अशी मागणी आमदार धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.

Published on: Oct 12, 2023 10:45 PM