Pune Andolan : पुण्यात पतित पावन संघटनेकडून गुडलक चौकात आंदोलन
पुण्यात पावन संघटनेकडून गुडलक चौकात आंदोलन करण्यात आले. या दरम्यान आंदोलकांना अकबरुद्दीन ओवैसी यांच्या फोटोला जोडेमारत आंदोलन करण्यात आले. जो पर्यंत अकबरुद्दीन ओवैसी माफी मागत नाही तोपर्यंत त्याला महाराष्ट्र आणि भारत बंदी घालण्याची मागणी पतित पावन संघटनेकडून करण्यात आली.
पुणे – एम.आय.एमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांनी औरंगजेब यांच्या कबरीचे दर्शन घेतल्याने समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याच्या निषेधार्थ पतीत पावन संघटना(Patit pawan sanghatna) पुणे शहर यांच्याकडून आंदोलन करण्यात आले. पुण्यात पावन संघटनेकडून गुडलक चौकात हे आंदोलन करण्यात आले.या दरम्यान आंदोलकांना अकबरुद्दीन ओवैसी यांच्या फोटोला जोडेमारत आंदोलन करण्यात आले. जो पर्यंत अकबरुद्दीन ओवैसी माफी मागत नाही तोपर्यंत त्याला महाराष्ट्र(Maharashtra) आणि भारत बंदी घालण्याची मागणी पतित पावन संघटनेकडून करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी अकबरुद्दीन ओवेसीच करायचं काय खाली मुंडेवर वर पाय, ओवेसीचा जाहीर धिक्कार करण्यात आला.
Published on: May 15, 2022 06:29 PM
Latest Videos