VIDEO | पुणे, नागपूर झालं आता नाशिकच्या ‘या’ मंदिरातही ड्रेस कोड? दर्शनाला जाण्याआधी लक्ष द्या
पर्यटनाच्या दृष्टीने देखील काही भाविक येत असल्याने मंदिरात अनेकदा तोकडे कपडे घालून येतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी काळाराम मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी नियमावली, ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे.
नाशिक : राज्यातील महत्वाच्या मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता नाशिकच्या मंदिरांतदेखील लवकरच वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत आता मंदिर प्रशासन लवकरच निर्णय घेणाऱ असल्याचे कळत आहे. त्यामुळे नाशिकला जर देवदर्शनासाठी जाणार असाल तर आधी काय नियम असणार आहेत हे जाणून घ्या. नाशिकच्या प्राचीन श्री काळाराम मंदिरासह श्री कपालेश्वर मंदिर, श्री त्र्यंबकेश्वर, श्री सप्तशृंगगड आणि शेजारील जिल्ह्यात शिर्डीचे श्री साईबाबा मंदिरात आता लवकरच वस्त्र संहिता लागू करण्यात येणार आहे. याबाबत महासंघाचे अधिकारी आणि श्री काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास पुजारी यांनी माहिती दिली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने देखील काही भाविक येत असल्याने मंदिरात अनेकदा तोकडे कपडे घालून येतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी काळाराम मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी नियमावली, ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे.