Special Report | शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत कुणाचं पारडं जड?-tv9

Special Report | शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत कुणाचं पारडं जड?-tv9

| Updated on: Jul 25, 2022 | 9:14 PM

शिवसेनेची स्थापना झाली 1966 साली, नंतर 1976 मध्ये म्हणजे स्थापनेच्या जवळपास 10 वर्षानंतर शिवसेना पक्षाची घटना तयार झाली. 1988 नंतर शिवसेना पक्षाचं चिन्हं वाघ हे निश्चित झालं आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण.

एकनाथ शिंदेंनी विधीमंडळ पक्षाबरोबरच संघटनात्मक पक्षही फुटल्याचं जर सिद्ध केलं, तर ठाकरेंसाठी तो मोठा धक्का असेल. मात्र फक्त समर्थन मिळवूनच शिंदे शिवसेनेची मालकी घेऊ शकत नाहीत. एकनाथ शिंदेंसाठी अजून एक अडचण आहे, ती अडचण म्हणजे शिवसेना या पक्षाची घटना. शिवसेनेची संघटनात्मक रचना, शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी, शिवसेनेचे पक्ष प्रमुख, पक्षप्रमुखांना असलेले अधिकार आणि शिवसेनेची प्रतिनिधी सभा या गोष्टीही महत्वाच्या आहेत. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करत नवी कार्यकारिणी जाहीर केलीय., मात्र शिवसेनेची घटना नेमकी काय आहे., त्यात शिंदे बदल करु शकतात का, शिंदे गटाकडे तसे अधिकार आहेत का, यासाठी आधी शिवसेनेची घटना काय म्हणते, ते समजून घेऊयात. शिवसेनेची स्थापना झाली 1966 साली, नंतर 1976 मध्ये म्हणजे स्थापनेच्या जवळपास 10 वर्षानंतर शिवसेना पक्षाची घटना तयार झाली. 1988 नंतर शिवसेना पक्षाचं चिन्हं वाघ हे निश्चित झालं आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण.