VIDEO | गोवेकरांसह तळ कोकणासाठी गुड न्यूज; हवामान खात्यानं काय वर्तवला अंदाज?

VIDEO | गोवेकरांसह तळ कोकणासाठी गुड न्यूज; हवामान खात्यानं काय वर्तवला अंदाज?

| Updated on: Jun 11, 2023 | 12:46 PM

नागरिकांसह बळीराजाला प्रतिक्षा आहे ती मान्सूनची. याबाबत हवामान विभागाने नुकताच एक अंदाज वर्तवला आहे. ज्यामुळे गोवेकरांसह तळ कोकणासाठी ती आनंदाची बातमी आहे.

मुंबई : हवामानात होत असलेल्या बदलामुळं उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळत आहे. पण नागरिकांसह बळीराजाला प्रतिक्षा आहे ती मान्सूनची. याबाबत हवामान विभागाने नुकताच एक अंदाज वर्तवला आहे. ज्यामुळे गोवेकरांसह तळ कोकणासाठी ती आनंदाची बातमी आहे. 8 जून रोजी केरळात मान्सून दाखल झाला. पण तो महाराष्ट्रात पुढे ढकलणार अशी शक्यता होती. मात्र हवामानात होत असलेले बदल आणि बिपरजॉय चक्रीवादळामुळं मान्सून त्याआधीच राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. अनुकूल हवामानामुळं पुढील 48 तासांत गोव्यासह महाराष्ट्रातील तळ कोकणात पावसाची बरसात होऊ शकते. नैऋत्व मान्सून आज पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटकातील कारवारपर्यंत पुढे सरकला आहे. त्यामुळे 48 तासांत मान्सून महाराष्ट्राच्या काही भागात पुढे सरकण्याची शक्यता आहे. गोवा, केरळ, कर्नाटक व तळकोकणात ढगांची दाटी होताना दिसत आहे. ही मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती आहे.

Published on: Jun 11, 2023 12:46 PM