Special Report | सलग दुसऱ्या सभेत Raj Thackeray यांच्या टार्गेटवर Pawar

| Updated on: May 03, 2022 | 10:59 PM

बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंग बंद झालेच पाहिजेत” हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे, असं आव्हान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय. 

मुंबई : मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमवर ते आजही ठाम आहे. त्यानुसार राज ठाकरे यांनी आज एक पत्रक काढून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केलंय. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मशिदींवरील भूमिकेची आठवण करुन दिली आहे. तसंच राज यांनी पत्रकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर टीका केलीय. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, कै. हिंदूहदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंग बंद झालेच पाहिजेत” हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे, असं आव्हान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय.

Published on: May 03, 2022 10:59 PM