राष्ट्रवादी नेमकी कोणाची? आज फैसला? सिल्वर ओक परिसरात लागले बॅनर; ‘शरद पवार यांचा उल्लेख... योद्धा....’

राष्ट्रवादी नेमकी कोणाची? आज फैसला? सिल्वर ओक परिसरात लागले बॅनर; ‘शरद पवार यांचा उल्लेख… योद्धा….’

| Updated on: Jul 05, 2023 | 11:54 AM

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सध्या जोरदार रस्सी खेच पाहायला मिळत आहे. याचदरम्यान अजित पवार यांच्या मंत्रालयाच्यासमोरील पक्ष कार्यालयाच्या बाहेर शरद पवार समर्थकांनी बॅनरबाजी केली.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा? याचा फैसला आज होणार आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सध्या जोरदार रस्सी खेच पाहायला मिळत आहे. याचदरम्यान अजित पवार यांच्या मंत्रालयाच्यासमोरील पक्ष कार्यालयाच्या बाहेर शरद पवार समर्थकांनी बॅनरबाजी केली. तेथे 83 वर्षाचा योद्धा मैदानात असं मजकूर असलेला बॅनर लावले. असेच बॅनर आता सिल्वर ओक परिसरात देखील पाहायला मिळत आहेत. यावर गडी एकटा निघाला… 83 वर्षाचा योद्धा.. असा उल्लेख आहे.

Published on: Jul 05, 2023 11:54 AM