भाजपची डोकेदुखी वाढली? जानकर यांच्यानंतर आता ‘या’ नेत्याने ही सांगितला लोकसभेच्या दोन जागांवर हक्क
भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रासपच्या महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपने यापूर्वी मला धोकाच दिला आहे. लोकसभेला जागा दिली नव्हती. आता लोकसभेसाठी चार जागा सन्मानपूर्वक द्याव्यात अन्यथा आम्ही स्वतंत्र लढू असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्षांकडून सुरुवात करण्यात आली आहे. सध्या युती आणि आघाडीमध्ये घटक पक्षांच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची चिन्ह असतानाच आता मित्र पक्षाकडून भाजपला देखील इशारा देण्यात आला आहे. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रासपच्या महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपने यापूर्वी मला धोकाच दिला आहे. लोकसभेला जागा दिली नव्हती. आता लोकसभेसाठी चार जागा सन्मानपूर्वक द्याव्यात अन्यथा आम्ही स्वतंत्र लढू असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे. त्या पाठोपाठ आता रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी देखील थेट दोन जागांची मागणी केली आहे. तसेच हातकणंगले मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघावर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जागावाटपावरून मित्र पक्षांत नाराजीचा सुर दिसून येत आहे.