ST Bus Driver Girl Death | आगार व्यवस्थापकानं सुट्टी दिली नाही, ST चालकाच्या मुलीचा मृत्यू
दिग्रस पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि पोलीस कर्मचारी यांनी एसटी आगारात धाव घेत प्रकरण तडजोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र एसटी चालक आक्रमक होत आगार व्यवस्थापक आणि अन्य अधिकाऱ्यांवर त्वरीत कारवाई जोपर्यंत करणार नाहीत, तोपर्यंत आगारातून हलणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पोलिसांपुढेही मोठा पेच निर्माण झाला.
यवतमाळ : एसटी चालक किशोर राठोड यांची चौदा वर्षाची अंपग मुलगी नेहमी आजारी असायची. तिला दवाखान्यात उपचारासाठी नेण्याकरीता एसटी चालकाने दिग्रसचे आगार प्रमुख संदीप मडावींना रजा देण्याची विनंती केली. मात्र आगार व्यवस्थापकाने रजा न दिल्यामुळे एसटी चालकाच्या मुलीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप करीत चालकाने चक्क मुलीचा मृत्यूदेह ऑटोने एसटी आगारात आणल्याने मोठी खळबळ उडाली. दरम्यान दिग्रस पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि पोलीस कर्मचारी यांनी एसटी आगारात धाव घेत प्रकरण तडजोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र एसटी चालक आक्रमक होत आगार व्यवस्थापक आणि अन्य अधिकाऱ्यांवर त्वरीत कारवाई जोपर्यंत करणार नाहीत, तोपर्यंत आगारातून हलणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पोलिसांपुढेही मोठा पेच निर्माण झाला.
Published on: May 26, 2022 08:14 PM
Latest Videos