जुनी पेन्शनला होकार? सरकारी कर्मचाऱ्यांची संपातून माघार, मुख्यमंत्र्यांसोबत काय झाली चर्चा?

| Updated on: Mar 20, 2023 | 6:27 PM

VIDEO | राज्यातील शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप आज अखेर मागे, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांना कोणतं दिलं आश्वासन?

मुंबई : राज्यातल्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांची संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या सात दिवसांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू होता. मात्र आता सात दिवसानंतर राज्यातील शासकीय कर्मचारी आणि निमशासकीय कर्मचारी संघटनांनी संपामधून माघार घेतल्याचे समोर आले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा आश्वासन दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली आहे. पेन्शन संदर्भातल्या मागण्याबाबत एक मसुदा तयार करण्यात आला असून या संपातून माघार घेतल्यानंतर आता उद्यापासून कर्मचारी आपल्या रोजच्या कामावर रुजू होतील. गेल्या सात दिवसापासून अनेक रुग्णालयांमध्ये असो किंवा अन्य सरकारी कार्यालयांमध्ये सर्वसामान्यांची गैरसोय होत होती मात्र आता सर्व सुरळीत होणार असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांना सकारात्मक आश्वासन देण्यात आल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

Published on: Mar 20, 2023 06:27 PM
एकनाथ खडसे यांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा, “विरोधकांना छळण्याचे…”
‘मी विधिमंडळास चोरमंडळ म्हटले नसून…’, संजय राऊत यांचं हक्कभंग नोटीसला उत्तर