भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?

भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?

| Updated on: Oct 16, 2024 | 4:03 PM

प्रतिबंधित खलिस्तान टायगर फोर्सचा (केटीएफ) नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडादरम्यानच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. निज्जरची हत्या जून महिन्यात कॅनडातील सरे येथे झाली होती.

खलिस्तानवादी अतिरेकी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरुन गेले काही महिने भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध तणावग्रस्त झाले आहेत. दोन्ही देशांनी परस्परांच्या दुतावासातील वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. हरदीप सिंग निज्जर याचे कॅनडात वास्तव्य असून त्याची हत्या जून महिन्यात कॅनडातील सरे येथे झाली होती. कॅनडाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी या प्रकरणात केलेल्या तपासानंतर भारत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलनी जोली यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतीय गुप्तहेर संघटना ‘रिसर्च अँड एनालिसिस विंगचे (रॉ) प्रमुख पवन कुमार राय यांच्या हकालपट्टीचे आदेश देण्यात आले आहेत. हरदीप सिंग निज्जर या कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येत भारत सरकारच्या एजंटचा हात होता का, याचा तपास करत आहोत, अशी माहिती कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पार्लमेंटच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये दिली आहे.भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी ट्रुडो यांचे आरोप निर्थक आणि कोणाची तरी फूस असलेले आहेत असे म्हणत फेटाळले आहेत. खलिस्तानवाद्यांना लक्ष्य करणाऱ्या भारतीय एजंटशी बिष्णोई टोळीचे संबंध आहेत असाही आरोप कॅनडाने केलेले आहेत.

 

Published on: Oct 16, 2024 04:03 PM