India Corona | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत 12 हजारांनी घट, कोरोनाबळीही कमी

| Updated on: May 30, 2021 | 11:28 AM

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) सलग तिसऱ्या दिवशी मोठी घट पाहायला मिळत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 12 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 1 लाख 65 हजार 553 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. 46 दिवसांनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या निचांकी आकड्यांवर गेली आहे. कालच्या दिवसात 3 हजार 460 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटतानाच कोरोनाबळींच्या संख्याही कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे