Atal Bihari Vajpayee: शरद पवारांची बंडखोरी, वाजपेयी म्हणाले, पक्ष तोडून सत्ता मिळत असेल तर अशा सत्तेला मी चिमट्यानेही स्पर्श करणार नाही!

Atal Bihari Vajpayee: शरद पवारांची बंडखोरी, वाजपेयी म्हणाले, “पक्ष तोडून सत्ता मिळत असेल तर अशा सत्तेला मी चिमट्यानेही स्पर्श करणार नाही!”

| Updated on: Aug 16, 2022 | 1:37 PM

Atal Bihari Vajpayee: देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या साहित्यिक शैलीत शरद पवार यांच्या बंडखोरीवर भाष्य केलं होतं.

बंडखोरी करणं अन् त्यातून नवी आघाडी स्थापित करत सत्ते येणं, हे देशासह महाराष्ट्रासाठी नवीन नाहीये. शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेली बंडखोरी आपण सगळेच जाणतो. त्यावर देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी त्यांच्या साहित्यिक शैलीत प्रत्युत्तर दिलं होतं. पक्ष तोडून बंड करत दुसऱ्या पक्षासोबत जाणं मला पसंत नाही. असं स्वत:च्याच पक्षाला तोडत सत्ता मिळत असेल तर अश्या सत्तेला मी चिमट्यानेही स्पर्श करणार नाही!, अश्या रोखठोक शब्दात वाजपेयी यांनी संसदेत बंडखोरीवर भाष्य केलं होतं. त्याचं हे भाषण खूप व्हायरल झालं होतं. अटल बिहारी वाजपेयी या नावाचा भारतीय राजकारणावर कायमच दबदबा राहिला. त्यांचं वकृत्व मानवी मनाचा ठाव घेतं. त्यांच्या कविता मनाला भीडतात. अश्या या संवेदनशील राजकारणी व्यक्तीमत्वाचा आज स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त त्यांचं हे खास भाषण…

Published on: Aug 16, 2022 01:25 PM