इंडिया की भारत? देशाचे नाव बदलणार का? काय आहे केंद्र सरकारचा गेम प्लॅन? पाहा स्पेशल रिपोर्ट
आपल्या देशाला 2 नाव आहेत...एक इंडिया आणि दुसरं भारत...तुमच्या पासपोर्टवरही ते दिसून येईल... देवनागरी मध्ये त्यावर लिहिलंय की, भारत गणराज्य... आणि इंग्रजीत Republic of India आता इंडिया नाव कसं पडलं.. ते पाहूयातत..
मुंबई : 6 सप्टेंबर 2023 | इंडिया आणि भारत या देशाच्या नावावरुनचा वाद वाढला आहे. देशाचे नाव बदलून सरकार राज्यघटना बदलण्याचे काम करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. देशाला इंडिया आणि भारत हे दोन्ही नाव संविधानात असताना त्यातलं एक नाव हटवण्याचा अट्टाहास कशासाठी असा सवाल विरोधकांनी केलाय. तर, देशाचे नाव बदलण्याचा कोणताही विचार नाही ही फक्त एक अफवा असल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलंय. मात्र, भाजप नेते देशाचा मूळ शब्द भारत असल्यामुळे तेच नाव ठेवण्यात गैर काय असा प्रश्न करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या संविधानात इंडिया दॅट इज भारत हा मार्ग निवडला. इंडिया आणि भारत हे एकमेकांच्या विरोधात नाही. ती दोन्ही नावं स्वीकारली आहेत. मात्र, यावरुन विरोधकांनी संविधान बदलाची केलेली टीका भरकटलेली आहे,’ असे प्रकाश आंबेडकर याचं मत आहे.