प्रकल्प तामिळनाडू सरकारनं खेचून नेला, टीका मात्र शिंदे-फडणवीस सरकारवर; राष्ट्रवादी नेत्याने का केली टीका?
नाईकी, आदिदास कंपन्यांचे उत्पादन बनवणारी पो चेन ही कंपनी भारतात गुंतवणूक करणार होती. त्यासाठी देशातील अनेक राज्यांनी प्रयत्न केले होते. मात्र तो 2300 कोटींचा प्रकल्प तमिळनाडू सरकारने खेचून नेला
मुंबई : राज्यातील अनेक उद्योग हे राज्याबाहेर जात आहेत. तरूणांच्या हाताला काम मिळत नाही. बेरोजगारी वाढत आहे. पण हे शिंदे-फडणवीस सरकार काही करताना दिसत नाही अशी टीका विरोधकांकडून होताना दिसते. याचमुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. मात्र दुसरीकडे त्यांनी तमिळनाडू सरकारचं अभिनंदन केलं आहे. यामुळे सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. रोहीत पवार यांनी पो चेन कंपनीचा प्रकल्प तमिळनाडू सरकारने खेचून नेला, त्यांचे अभिनंदन असे ट्विट केलं आहे.
नाईकी, आदिदास कंपन्यांचे उत्पादन बनवणारी पो चेन ही कंपनी भारतात गुंतवणूक करणार होती. त्यासाठी देशातील अनेक राज्यांनी प्रयत्न केले होते. मात्र तो 2300 कोटींचा प्रकल्प तमिळनाडू सरकारने खेचून नेला. यावरून रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच 20 हजार युवांना रोजगार देणारा पो चेन कंपनीचा प्रकल्प खेचून आणणल्याबाद्दल तमिळनाडू सरकारचे अभिनंदन असे म्हणत महाराष्ट्र सराकरावर खोचक टीका केली आहे. तर महाराष्ट्राबद्दल अशा बातम्या दिसत नसल्याने तमिळनाडू सरकारचं अभिनंदन करताना त्यांचा हेवा आणि ईर्ष्याही वाटतेय आणि आपलं राज्य मागं पडत असल्याचं दुःखंही होतंय, असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.