येवल्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर संकट, पिकावर अळीचा प्रादुर्भाव

येवल्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर संकट, पिकावर अळीचा प्रादुर्भाव

| Updated on: Aug 04, 2023 | 12:39 PM

येवला तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. कारण सोयाबीन पिकावर अळी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

येवला, 4 ऑगस्ट 2023 | येवला तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. कारण सोयाबीन पिकावर अळी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदा येवला तालुक्यात जेमतेम पावसाने हजेरी लगवली या पावसावर येवला तालुक्यातील शेतकर्यांनी सोयाबीनचे पिक घेतले. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने आता आलेल्या सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात आळीचा प्रादुर्भाव झाला आहे. महागड्या औषधांची फवारणी करून देखील हातातोंडाशी आलेलं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. सोयाबीनवर एकरी 30 ते 35 हजार रुपये केलेला उत्पादन खर्च वाया जातो की काय असा मोठा प्रश्न शेतकऱ्याला पडला असल्याने आता शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे.

Published on: Aug 04, 2023 12:39 PM