पठ्ठ्याचा नादच खुळा, कडुलिंबाच्या झाडावर घातले सूर्यनमस्कार, फोटो एकदा पाहाच

पठ्ठ्याचा नादच खुळा, कडुलिंबाच्या झाडावर घातले सूर्यनमस्कार, फोटो एकदा पाहाच

| Updated on: Jun 21, 2023 | 3:11 PM

जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी आणि जमिनीपासून ते खोल समुद्रात आज योग दिन साजरा करण्यात आला. आपल्या राज्यातही तो अनेक ठिकाणी करण्यात आला. कुठं सामूहिक पद्धतीनं तर कुठं एकटाच वेगळ्या पद्धतीने योग दिन साजरा होताना दिसला.

नाशिक : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशात सगळीकडं मोठा उत्साह पहायला मिळत आहे. जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी आणि जमिनीपासून ते खोल समुद्रात आज योग दिन साजरा करण्यात आला. आपल्या राज्यातही तो अनेक ठिकाणी करण्यात आला. कुठं सामूहिक पद्धतीनं तर कुठं एकटाच वेगळ्या पद्धतीने योग दिन साजरा होताना दिसला. अशाच पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील बाळू मोकळ यांनी वसुदेव कुटुंबकम या थीमवर अनोख्या पद्धतीने योग दिवस साजरा केलाय. कडुलिंबाच्या झाडाच्या फांदीवर बसून त्याने तब्बल 51 योगासनासह 11 वेळा सूर्यनमस्कार करण्याचा विक्रम केलाय. ज्या झाडांपासून आपणास प्राणवायू मिळतो त्याच झाडांच्या सानिध्यात झाडावर योगासने केल्याचं बाळू मोकळ यांनी सांगितलं आहे. यापूर्वीही त्यांनी मोटासायकलवर देखील योगासनं केली होती. पण आता त्यांनी झाडाच्या थांदीवर केलेली योगासनांची सध्या जिल्ह्यात चर्चा होत आहे.

Published on: Jun 21, 2023 03:11 PM