IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारीची शक्यता
बॉलीवडू सुपरस्टार शाहरुख खान याच्या मुलाला ड्रग्सच्या प्रकरणात अटक करुन चर्चेत आलेल्या आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांना निवडणूकीच्या रिंगणात पाहायला मिळणार आहे. समीर वानखेडे राजकारणात जाणार याचा अंदाज मागे आला होता. आता त्यांनी थेट राजकारणातच नव्हे तर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांची घोषणा झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबपरला मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी आहे. या महाराष्ट्रातील दोन पक्षात फूट पडल्यानंतर ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. यासाठी अनेक पक्षांची मोर्चेबांधणी असून जागावाटपाची वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहे. यंदाच्या निवडणूकीत उमेदवारांची भाऊगर्दी होण्याची चिन्हे आहेत. महायुती-महाविकास आघाडीची जागावाटपावर बोलणी सुरु आहेत. कोणाच्या वाट्याला किती जागा येणार हे चित्र स्पष्ट झालेले नसताना आात महाराष्ट्र विधानसभेत यंदा वादग्रस्त माजी IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात समीर वानखेडे अंमली पदार्थ विरोधी पथकात असताना बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करुन चर्चेत आले होते. समीर वानखेडे आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या तिकीटावर धारावीतून निवडणूक लढवू शकतात असे म्हटले जात आहे.