Sushma Andhare | राज ठाकरे खरोखरच बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवत आहेत का? सुषमा अंधारे यांची टीका

Sushma Andhare | राज ठाकरे खरोखरच बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवत आहेत का? सुषमा अंधारे यांची टीका

| Updated on: Aug 30, 2022 | 5:44 PM

Sushma Andhare | राज ठाकरे हे खरोखरच बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवत आहेत का? असा खोचक सवाल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Sushma Andhare | राज ठाकरे हे खरोखरच बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवत आहेत का? असा खोचक सवाल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे. राज ठाकरे हे भाजपचा अजेंडा रेटत असल्याची टीका ही त्यांनी केली. राज ठाकरे ( Raj Thackeray) त्यांच्या पक्षासाठी झटत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. जे जाणते असतात तेच नेते होतात. त्यांनी अजाणत्यांना जाणतं करण्याचं मोठं काम करायला हवं. राज ठाकरे पक्षासाठी काम करताना कार्यकर्त्यांसाठी (MNS)ही गोष्ट करतात का असा सवाल विचारत राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रादेशिक आणि हिंदुत्वाचे काम तोडायला निघाल्याचा आरोपही त्यांनी केला. एवढेच नाहीतर राज ठाकरे हे भाजपचा अजेंडा रेटत आहेत. ते त्यांचे काम कंत्राटी पद्धतीने करत असल्याची घणाघाती टीका अंधारे यांनी यावेळी केली.

Published on: Aug 30, 2022 05:44 PM