Sanjay Raut स्वातंत्र्य सैनिक आहेत का? Atul Bhatkhalkar यांची शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनावर प्रतिक्रिया
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागताला हजारो शिवसैनिक (Shivsena) मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. ईडीने कारवाई केल्यानंतर राऊत पहिल्यांदाच मुंबईत येत असल्याने सेनेकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागताला हजारो शिवसैनिक (Shivsena) मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. ईडीने कारवाई केल्यानंतर राऊत पहिल्यांदाच मुंबईत येत असल्याने सेनेकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. संजय राऊतांच्या फोटोसह पोस्टरबाजी करताना शिवसैनिक दिसून आले. विमानतळापासून भांडुपपर्यंत रॅली काढून शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. दोन दिवसांपूर्वीच संजय राऊतांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. त्यानंतर शिवसेनेकडून हे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं आहे. बुधवारीच शरद पवारांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत संजय राऊतांवरील ईडीने केलेल्या कारवाईची तक्रार केली होती. दरम्यान, शिवसेनेच्या शक्तीप्रदर्शनानंतर भाजप नेत्यांनी त्यावर टीका सुरु केली आहे. अशा प्रकारचं शक्तीप्रदर्शन करायला संजय राऊत काय स्वातंत्र्य सैनिक आहेत का? असा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.