Special Report | व्हायरल फोटो खरोखर एकनाथ शिंदेंचा आहे का? छगन भुजबळांनी WhatsApp वर हा फोटो अजित पवारांना पाठवला
काही जणांनी हा फोटो एकनाथ शिंदेंचा नसल्याचीही शंका व्यक्त केली. अशी शंका व्यक्त करण्याचं पहिलं कारण होतं ते म्हणजे फोटोत या व्यक्तीसोबत दिसणाऱ्या रिक्षाच्या नंबरप्लेटचं. ठाण्याचा आरटीओ नंबर MH 04 आहे, आणि या फोटोत दिसणारी. रिक्षा MH 14 म्हणजे पिंपरी-चिंचवडच्या पासिंगची आहे.
मुंबई : ज्या काळात एकनाथ शिंदे( Eknath Shinde) रिक्षा चालवत होते, त्याच काळात काढलेला हा फोटो व्हायरल( viral photo) झाला असल्याचा दावा सोशल मीडियावरुन झाला. एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याशी साधर्म्य, शिंदेसारखीच दाढी आणि तरुणपणी ज्याप्रकारे शिंदेंचा पेहराव असायचा, त्याचप्रकारचा पेहराव. यामुळे अनेकांना हा फोटो एकनाथ शिंदे यांचाच असल्याची खात्री पटली. मात्र काही जणांनी हा फोटो एकनाथ शिंदेंचा नसल्याचीही शंका व्यक्त केली. अशी शंका व्यक्त करण्याचं पहिलं कारण होतं ते म्हणजे फोटोत या व्यक्तीसोबत दिसणाऱ्या रिक्षाच्या नंबरप्लेटचं. ठाण्याचा आरटीओ नंबर MH 04 आहे, आणि या फोटोत दिसणारी. रिक्षा MH 14 म्हणजे पिंपरी-चिंचवडच्या पासिंगची आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो अजित पवारांच्या मोबाईलवरही गेला. छगन भुजबळांनी व्हॉट्सअॅपद्वारे हा फोटो अजित पवारांना पाठवला. जसं अनेकांना हा फोटो खरोखर शिंदेंचाच आहे का, याचं कुतूहल होतं, तसंच ते अजित पवारांनाही पडलं. मात्र फोटोतली रिक्षा MH 14 असल्यामुळे अजित पवारांनीही हा फोटोतला व्यक्ती खरोखर कोण आहे., याचा शोध घेतला. शोध घेतल्यानंतर हा व्हायरल झालेला मूळ फोटो शिंदेंचा नसून पिंपरी-चिंचवडमधल्या एका दुसऱ्या व्यक्तीचा असल्याचं समोर आलं. त्या व्यक्तीचं नाव आहे बाबा कांबळे. बाबा कांबळे हे पिंपरीमधल्या महाराष्ट्र रिक्षापंचायत संघटनेचे अध्यक्ष आहेत., पीएमार्फत अजित पवारांनी थेट बाबा कांबळेंशी फोनवरुन संपर्क केला. आणि तुमचा हा फोटो शिंदेंच्या नावानं कसा व्हायरल झाला. याची माहितीही घेतली.