Video | ही गुंडांसाठी मोदी गॅरंटी आहे काय ? उद्धव ठाकरे यांचा सवाल

Video | ही गुंडांसाठी मोदी गॅरंटी आहे काय ? उद्धव ठाकरे यांचा सवाल

| Updated on: Feb 12, 2024 | 7:02 PM

आपली राज्यातील अवस्था सध्या बेबंदशाहीने पोखरली आहे. त्यामुळे राज्यातील गुंडगिरी रोखण्यासाठी राज्यातील पोलिसांना 24 तास देऊन मोकळे सोडावे अशी मागणी शिवसेनेचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. नगर सेवक अभिजीत घोसाळकर यांची झालेली हत्या आणि मॉरीस या गुंडाची आत्महत्या प्रकरण संशयास्पद असून त्याचीही चौकशी करण्याची मागणी ठाकरे यांनी केली आहे.

मुंबई | 10 फेब्रुवारी 2024 : राज्यात सध्या उद्वीग्न अवस्था पसरली आहे. डोळ्यासमोर जी बेबंदशाही ती पाहून महाराष्ट्राचे मन दुखावले आहे. सरकारच्या आशीवार्दाने गेले दीड वर्षे महाराष्ट्रात गुंडगिरी सुरु असल्याने, पूर्वी ‘मेलेडी खाओ खूद जान जाओ’ अशी जाहीरात होती तशी आता ‘भाजपा में आओ सब कुछ भुल जावो, ही गुंडासाठी भाजपाची मोदी गॅरंटी आहे का ? असा सवाल माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे का ? असा सवालही त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत केला आहे. श्वान गाडीखाली मेला तरी म्हणतील राजीनामा द्या हे त्यांचे वक्तव्य धक्कादायक आहे. राज्यातील प्राण्याची जबाबदारी ही राज्य प्रमुखावर असते असे ठाकरे यावेळी म्हणाले. राज्यातील गुंडगिरी पाहता राज्यात राष्ट्रपतीची राजवट लागू करून निवडणूका घ्या अशी मागणीच उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ही मागणी आम्ही जनतेच्या न्यायालयात करीत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. कारण आता राज्यपाल या पदालाच काही अर्थ राहीला नसल्याचेही ते म्हणाले. आमच्या कार्यकर्त्याची काल जी हत्या झाली. ती धक्कादायक आहे सूड भावनेने अत्यंत टोकाचे पाऊल उचलतो. परंतू तो माणूस आत्महत्या का करेल ? तसेच सीसीटीव्हीत गोळी मारणारा दिसत नसल्याने या प्रकरणात सुपारी देऊन या दोघांची हत्या कोणी केली तर नाही ना याची चौकशी करण्याची मागणी ठाकरे यांनी यावेळी केली आहे.

 

Published on: Feb 10, 2024 02:51 PM