चांद्रयान-3 मोहीमेबाबत इस्रोचे नवे ट्विट; चांद्रयान नेमका किती वाजता चंद्रावर उतरणार?
चांद्रयान-3 मोहीमेवरून देशासह अख्या जगाला उत्सुकता लागेलली आहे. तर चंद्रावर नक्की हे यान कधी उतरणार आणि कसे यावरून इस्रोचे नवे ट्विट केलं आहे.
मुंबई : 23 ऑगस्ट 2023 | भारताचे स्वप्न हे आज सत्यात उतरणार आहे. आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भारताचे चांद्रयान-3 हे चंद्रावर उतरणार आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष हे चांद्रयान-3 मिशनवर आहे. याच्याआधी रशियाचे मिशन मून फेल झाल्याने जगाच्या नजरा या चांद्रयान-3 मिशनकडे लागले आहे. याचदरम्यान इस्रोने नवे ट्विट करत महत्वाची माहिती दिली आहे. यावेळी इस्रोने केलेल्या या ट्विटमध्ये इस्त्रोचे शास्त्रज्ज्ञ हे बंगळुरूमधील कमांड सेंटरमध्ये यावर नजर ठेवून आहेत. तर याआधी चांद्रयान-3 हे चंद्रावर ६ वाजून ४ मिनिटांनी उतरणार होते. मात्र आता त्याचा वेळी बदलला आहे. आता हे यान ५ वाजून ४४ मिनिटांनी उतरण्याची शक्यता आहे. तर यावर सध्या इस्त्रोचे शास्त्रज्ज्ञ त्यावर लक्ष ठेवून आहेत.
Published on: Aug 23, 2023 03:49 PM
Latest Videos