सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात; बस थेट 400 फूट दरीत कोसळली, 25 प्रवासी जखमी

सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात; बस थेट 400 फूट दरीत कोसळली, 25 प्रवासी जखमी

| Updated on: Jul 12, 2023 | 11:12 AM

याला महिनाही उलटत नाही तोच औरंगाबादच्या सावंगीजवळ समृद्धी महामार्गावरही खासगी बसच मोठा अपघात झाला आहे. या अपघातात देखील 20 प्रवासी जखमी झाले आहेत. त्याचदरम्यान आता सप्तश्रृंगी गडावर एक भयंकर अपघात झाल्याचे समोर येत आहे.

नाशिक : बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर मोठा अपघात होऊन २५ जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते. याला महिनाही उलटत नाही तोच औरंगाबादच्या सावंगीजवळ समृद्धी महामार्गावरही खासगी बसच मोठा अपघात झाला आहे. या अपघातात देखील 20 प्रवासी जखमी झाले आहेत. त्याचदरम्यान आता सप्तश्रृंगी गडावर एक भयंकर अपघात झाल्याचे समोर येत आहे. हा अपघात गडाच्या घाटात झाला असून बस थेट 400 फूट खोल दरीत गेली आहे. ज्यात यात 1 प्रवाशाचा मृत्यू झाला असून, २५ जण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशी, शासकीय यंत्रणेकडून मदत कार्य सुरू करण्यात आल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. तर त्यांनी अपघातस्थळी जात पाहणी केली आहे. यावेळी भुसे यांनी, सप्तशृंगी घाटात एसटी बसला अपघात झाला असून जखमींना सर्वोतोपरी मदत करण्याच्या सुचना संबंधित यंत्रणेला दिल्याचे सांगितलं आहे. तर जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 12, 2023 11:12 AM