Jitendra Awhad on Sharad Pawar | शरद पवार यांना राष्ट्रपती भवनात कोंडून घेण्यासारखं आहे-tv9
मला असं वाटतं की, शरद पवार यांनी स्वत:ला कोंढून घेऊ नये. तर शरद पवार हा एक विचार असून तो महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला पुरक आहे.
मुंबई: देशातील सर्वोच्च स्थान असणाऱ्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहिर झाली असून काहीच दिवसांवर ती आली आहे. त्यातच आता राष्ट्रपती पदासाठी पक्षांकडून नावे समोर येत आहेत. असेच नाव राज्यातूनही आता समोर येत असून त्यामुळे राज्यात चर्चेला उधान आले आहे. यावेळी राष्ट्रपती पदासाठी (President Election) उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव समोर आले आहे. त्यावर अनेकांनी आपली प्रतिक्रीया दिल्या आहेत. आता याच विषयावर गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Dr. Jitendra Awhad) यांनी आपली प्रतिक्रीया आहे. ते म्हणाले की, मला असं वाटतं की, शरद पवार यांनी स्वत:ला कोंढून घेऊ नये. तर शरद पवार हा एक विचार असून तो महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला पुरक आहे. त्यांना मोकळं लागतं. त्यांना लोक लागतात. त्यामुळे त्यांच्यासाठी राष्ट्रपतीपद हे राष्ट्रपती भवनात कोंडून घेण्यासारखं आहे.