Nana Patole | एकीकडे दोस्ती करायची आणि पाठीवर वार करायचा,ही काँग्रेसची वृत्ती नाही, नाना पटोले यांचा घणाघात
Nana Patole | एकीकडे दोस्ती करायची आणि पाठीवर वार करायचा अशी काँग्रेसची वृत्ती नसल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.
Nana Patole | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आघाडीतील मित्रपक्षांवर आज घणाघात केला. आपल्या पक्षाला विचारात घेतले जात नसेल तर आघाडीत राहायचे की नाही याचा विचार करावा लागेल असे पटोले यांनी म्हटले आणि लागलीच त्यांनी एकीकडे दोस्ती करायची आणि पाठीवर वार करायचा अशी काँग्रेसची वृत्ती नसल्याचा घणाघात त्यांनी नाव न घेता आघाडीतील मित्र पक्षांवर केला. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडी (MVA)स्थापन झाल्याचा आरोप भाजपने केला होता. ही नैसर्गिक आघाडी नसल्याचा ही आरोप त्यावेळी करण्यात आला होता. आता एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडानंतर एकूणच या आघाडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज खुद्द नाना पटोले यांनी महाविकास आघाडी ही काही नैसर्गिक आघाडी नाही, एका विपरीत परिस्थितीत उभी राहिलेली आघाडी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.