Supriya Sule on Ajit Pawar | देहूत अजितदादांना बोलून न देणं हे धक्कादायक, हा महाराष्ट्राचा अपमान

Supriya Sule on Ajit Pawar | देहूत अजितदादांना बोलून न देणं हे धक्कादायक, हा महाराष्ट्राचा अपमान

| Updated on: Jun 14, 2022 | 8:42 PM

कार्यक्रमाच्या आधीच अजित पवारांच्या भाषणाबाबत पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. मात्र येथे राजकारण केले. त्यांना परवागी दिली नाही असेही खा. सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे आज देहूत आले होते. त्यांच्या हस्ते जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या शीळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पार पडला. यावेळी मंचावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह नेते आणि मंदिर समितेचे मुख्य उपस्थित होते. यानंतर वारकऱ्यांना पंतप्रधान यांनी आपल्या भाषणाणे संबोधित केले. तर देवेंद्र फडणवीस यांनी देकील भाषण केले. मात्र अजित पवार यांना (Ajit Pawar) भाषण भाषण करता आलं नाही. त्यावरून आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तापलेले आहेत. त्यांच्याकडून विरोध होत आहे. त्यावरूनच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी आपली प्रतिक्रीया देताना अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री असूनही त्यांना भाषण करून दिलं नाही हा माहाराष्ट्राचा अपमान असल्याचे म्हटलं आहे. तसेच त्यांनी या कार्यक्रमाच्या आधीच अजित पवारांच्या भाषणाबाबत पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. मात्र येथे राजकारण केले. त्यांना परवागी दिली नाही असेही खा. सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.