जे. जे. रुग्णालयात राजीनामा बाँम्ब, नऊ डॉक्टरांचे राजीनामे, डॉ. लहाने यांच्याही समावेश

जे. जे. रुग्णालयात राजीनामा बाँम्ब, नऊ डॉक्टरांचे राजीनामे, डॉ. लहाने यांच्याही समावेश

| Updated on: Jun 01, 2023 | 7:27 AM

‘मार्ड’च्या आरोपांमुळे व्यथित होऊन मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्रचे समन्वयक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख आणि डॉ. सायली लहानेंसह 9 जणांचे तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. यावेळी डॉ. रागिणी पारेख आणि डॉ. तात्याराव लहाने हे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) नियमाचे उल्लंघन करत आहेत.

मुंबई : जे. जे. रुग्णालयात एकाच वेळी 9 डॉक्टरांनी बुधवारी राजीनामे दिले. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ‘मार्ड’च्या आरोपांमुळे व्यथित होऊन मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्रचे समन्वयक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख आणि डॉ. सायली लहानेंसह 9 जणांचे तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. यावेळी डॉ. रागिणी पारेख आणि डॉ. तात्याराव लहाने हे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) नियमाचे उल्लंघन करत आहेत. निवासी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यापासून दूर ठेवणे, शैक्षणिक अनियमितता, शैक्षणिक आणि संशोधन उपक्रम, निवासी डॉक्टरांवर अश्लील भाषेत टिप्पणी असे त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. तर त्यांच्याविरोधात जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बुधवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून बेमुदत आंदोलन पुकारले आहे. डॉ. पारेख आणि डॉ. तात्याराव लहाने यांची बदली करावी, तसेच आवश्यक पदांवर प्राध्यापकांची लवकरात लवकर भरती करावी, अशा मागण्या निवासी डॉक्टरांनी केल्या आहेत. तर जे.जे. हॉस्पीटलचे अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे या मागील एका वर्षापासून मानसिक त्रास देत असल्याची लेखी तक्रार करत या सर्व 9 वरिष्ठ डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले आहेत.

Published on: Jun 01, 2023 07:27 AM