काय झाडी फेम शहाजी बापू पाटील याचं कुणाला आश्वासन? 'तुमच्यासाठी मंत्रीपद मागतो'

काय झाडी फेम शहाजी बापू पाटील याचं कुणाला आश्वासन? ‘तुमच्यासाठी मंत्रीपद मागतो’

| Updated on: Oct 01, 2023 | 10:44 PM

पाटील परिवाराला मंत्री पद काही नवीन नाही. तुम्हाला मंत्रीपद मिळावे मात्र आम्हाला पण मंत्री पद मिळू द्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत भेटून तुम्हाला मंत्रीपद द्या अशी जनतेची मागणी आहे असे सांगतो. तुमच्यासाठी मंत्रीपद मागतो.

धाराशिव : 1 ऑक्टोंबर 2023 | धाराशिव जिल्ह्याला 15 महिन्यात पाच हजार कोटी रुपयांचा विकास निधी आमदार राणा पाटील यांनी आणला. त्यानिमित शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी शहाजी बापू पाटील यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने राणा पाटील आणि कुटुंबाला मिश्कील टोला लगावला. पाटील परिवाराला मंत्री पद काही नवीन नाही. मंत्री पद वापरून वापरून यांच्या घराच्या पायऱ्या गुळगुळीत झाल्या. तरीही मंत्रीपदाची अपेक्षा आहे. तुमच्या मंत्रिपदासाठी आम्ही शिफारस करू असा टोला त्यांनी लगावला. तुम्हाला मंत्रीपद मिळावे मात्र आम्हाला पण मंत्री पद मिळू द्या, असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत भेटून आमदार राणा यांना मंत्रीपद द्यावे अशी जनतेची मागणी आहे असे सांगतो तुमच्यासाठी मंत्रीपद मागतो असे आश्वासन त्यांनी दिले.

Published on: Oct 01, 2023 10:44 PM