पावसाचा जोर वाढला, खेडमधील जनजीवन विस्कळीत ‘जगबुडी’ने ओलांडली धोक्याची पातळी … अलर्ट जारी
पावसाचा मोठा फटका सध्या रहिवाशी भागाला बसला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही सध्या पावसाचा हाहाकार पहायला मिळत आहे. येथील मोठ्या नद्यांना आता पूर आला आहे.
रत्नागिरी, 25 जुलै 2023 | राज्याच्या अनेक भागांत सध्या पाऊसची संततधार सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका सध्या रहिवाशी भागाला बसला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही सध्या पावसाचा हाहाकार पहायला मिळत आहे. येथील मोठ्या नद्यांना आता पूर आला आहे. तर येथील जगबुडी नदीनं देखील आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीची पणीपातळी 7.45 मीटर एवढी असून धोका पातळी सात मीटर आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर प्रशासनाकडून जिल्ह्यात अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. तर गेल्या आठवड्यात चार दिवस रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. तसेच किनारपट्टीवरील नागरिकांना अलर्ट करण्यात आलं होतं. तर एकंदरीत सध्या पावसाचे जोर वाढलेला असून खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
Published on: Jul 25, 2023 11:00 AM
Latest Videos