नारायण राणेंवर राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले, 250 कोटींची ऑफर राणे घेऊन आले
राणे यांच्या आरोपानंतर राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना हे आरोप केले. तर राणे हे बरोबर बोलत आहेत. 500 कोंटीचा तो व्यवहार होता. 250 तुम्हाला आणि 250 मी ठेवतो असा राणे यांनी प्रस्ताव ठेवला होता.
मुंबई : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यांनी प्रकल्प उभारणी वेळी कोळशावर वीजनिर्मिती करणाऱ्या 34 उद्योजकांनी ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प होऊ नये, यासाठी या उद्योजकांनी ठाकरेंसोबत 500 कोटींचा व्यवहार केला होता, असा गंभीर आरोप केला होता. त्यावर आता खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पलवार करतांना ते आरोप फेटाळले आहेत. तर यासंदर्भात राणे यांनीच 250 कोटींची ऑफर उद्धव ठाकरे यांना दिली असा खुलासा केला आहे. त्यावरून आता महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. राणे यांच्या आरोपानंतर राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना हे आरोप केले. तर राणे हे बरोबर बोलत आहेत. 500 कोंटीचा तो व्यवहार होता. 250 तुम्हाला आणि 250 मी ठेवतो असा राणे यांनी प्रस्ताव ठेवला होता. त्यावर ठाकरे यांनी त्यांना लाथ मारून हाकललं होतं असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. तर जैतापूरच्या गैरव्यवहाराप्रकरणी आपण विधान सभेत मुद्दा लावून धरला असे राणे यांनी म्हटलं आहे.