क्षुल्लक कारणावरून उपसरपंचाला संपवलं; जळगाव हादरलं
बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच आता असाच प्रकार जळगावमधून समोर आला आहे.
बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच आता असाच प्रकार जळगावमधून समोर आला आहे. क्षुल्लक कारणावरून जळगावच्या कानसवाडा येथील शिवसेनेच्या ३६ वर्षीय माजी उपसरपंचाच्या छातीत धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी २१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. युवराज सोपान कोळी (वय ३६ रा. कानसवाडा ता. जळगाव) असं घटनेतील मृत्यू झालेल्या उपसरपंचाच नाव आहे. या घटनेनंतर युवराज कोळी यांच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, युवराज कोळी याचं गुरुवारी (२० मार्च) रात्री चार ते पाच जणांसोबत वाद झाला होता. या वादानंतर त्यांची चाकू आणि चॉपरने वार करून हत्या करण्यात आली आहे. टना घडली तेव्हा काही शेतकरी तिथे उपस्थित होते. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत मारेकरी कोळी यांच्यावर वार करुन पसार झाले होते.

मी दुर्लक्ष केलं...कामराने उलडवलेल्या खिल्लीनंतर शिंदे स्पष्टच म्हणाले

कामराची माफी नाहीच...शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पहिलं ट्वीट काय?

शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप

धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात
