जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर; पाहा कुणाकडे गेलं अध्यक्षपद
Jalgaon District Bank Election Result : जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली. जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवारांचे समर्थक संजय पवार यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे.
जळगाव : जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली. जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवारांचे समर्थक संजय पवार यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीत बंडखोरी झाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ॲड रवींद्र पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला. तर राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संजय पवार यांचा विजय झाला. तर जळगाव जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी शिंदे गटाचे उमेदवार अमोल पाटील बिनविरोध झाली आहे. महाविकास आघाडीत गद्दारी झाल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
Published on: Mar 11, 2023 01:32 PM
Latest Videos