Special Report | जळगावातले चारही आमदार फुटले! आता उद्धव ठाकरे कोणाला धुणार? सभेपुर्वीच चर्चा रंगली
सभेपुर्वीच चौकटीत बोला अन्यथा, तुमच्या सभेत घुसू, असा धमकी वजा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला होता. तर सभेत घुसून दाखवा आणि रोख 51 हजारांचे बक्षिस घेऊन जा, असं आव्हान राऊत यांनी केलं होतं
जळगाव : येथील पाचोरा या ठिकाणी ठाकरे गटाची सभा होणार आहे. यावेळी ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे. ठाकरे यांची शिवसेना फुटली आणि जळगावमध्ये मोठा हादरा ठाकरे यांना बसला. येथील 4 ही आमदार शिंदे यांच्याबरोबर गेले. त्यामुळे होणाऱ्या सभेत या चारजणांवर ठाकरे काय बोलणार याकडे जळगावकरांसह राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र याआधीच शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात चांगला सामना रंगला आहे. सभेपुर्वीच चौकटीत बोला अन्यथा, तुमच्या सभेत घुसू, असा धमकी वजा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला होता. तर सभेत घुसून दाखवा आणि रोख 51 हजारांचे बक्षिस घेऊन जा, असं आव्हान राऊत यांनी केलं होतं. त्यानंतर आम्ही दगड मारून सभा बंद करणारे लोक आहोत संजय राऊत यांना आंदोलन कसं करतात माहित नाही असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. त्याला प्रत्युत्तर देत मी वाघ आहे मला कुठल्याही सुरक्षेची गरज नाही असं राऊत यांनी म्हटलं होतं. त्यामुळे त्या सभेच्या आधीच गुलाबराव पाटील विरूद्ध संजय राऊत असा सामना पाहण्यास मिळतो आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट