जळगावात मनसे रस्त्यावर, राऊत यांच्या विरोधात आंदोलनाचं नेमकं कारण काय?
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पक्षाच्या महिला कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्या. त्यांनी संजय राऊत यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न झाला आहे
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे ठाकरे गटाची सभा होत आहे. याची जय्यत तयारी देखील झाली आहे. मात्र त्याच्याआधीच काल मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पक्षाच्या महिला कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्या. त्यांनी संजय राऊत यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे पाचोरा येते सध्या वातावरण तापलेलं आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे मनसे सैनिकही आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडून राऊत यांचा निषेध करण्यात आला. याचदरम्यान त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रणामे मनसे आज रस्त्यावर उतरली होती. त्यामुळे चौकात पोहोचलेल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर राऊत यांनी आपली बेताल वक्तव्य थांबवली नाही तर जशास तसे उत्तर दिले जाईल; असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.