त्याशिवाय मजा येत नाही, पंचनाम्यावरून जळगावात नेते आमने-सामने
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक ठिकाणी पंचनाम्यात अडथळा येत आहे. त्यावरून आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अमाने-सामने आले आहेत.
जळगाव : अवकाळी पावसाचा फटका जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही बसला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील फळगांसह फुलबागांनाही फटका बसला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक ठिकाणी पंचनाम्यात अडथळा येत आहे. त्यावरून आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अमाने-सामने आले आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री अन्य कामात व्यस्त असल्याने शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी पालकमंत्र्यांना वेळ नाही अशी टीका खडसे यांनी केली होती. त्यावर खडसेंचं कामचं विरोध करणे आहे. त्यांनी तो कायम करावा त्याच्याशिवाय मजा येत नाही असा टोला गुलाबराव पाटलांनी खडसेंना लगावला आहे.
Published on: Mar 20, 2023 09:13 AM
Latest Videos