आधी पत्र मुख्यमंत्र्यांना, मग हळदीचे विधी!; नवरानवरीचं एकनाथ शिंदेंना पत्र
जळगावच्या लग्नातील एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. लग्नाचा विधी थांबवून नवरदेव अन् नवरीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहलं आहे. पाहा...
जळगाव : जळगावच्या लग्नातील एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. लग्नाचा विधी थांबवून नवरदेव अन् नवरीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहलं आहे. शुभम भटू पाटील असं पत्र लिहणाऱ्या नवरदेवाचं नाव आहे.शुभम जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात असलेल्या जानवे गावाचा रहिवासी आहे. त्याने आपल्या हळदीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहलं आहे. शुभम पाटील ज्या अमळनेर तालुक्यात राहतो, तो तालुका दुष्काळी आहे. या तालुक्यासाठी वरदान ठरणारं पाडळसे धरण गेल्या 25 वर्षांपासून रखडलं आहे. हे धरण पूर्ण करावं या मागणीसाठी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं. सामाजिक दायित्व म्हणून शुभमने पण पत्र लिहलंय. त्याची ही कृती जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. ही नवरा-नवरीने लग्न मंडपात पत्र लिहत असल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.