स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मी असा मुख्यमंत्री पाहिला; शिवसेनेच्या मंत्र्याकडून एकनाथ शिंदें यांचं कौतुक
Gulabrao Patil : अडीच वर्षाच्या सरकारमध्ये स्पीडमध्ये काम नाही करू शकलो आता काम व्यवस्थित सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळात सगळेच लोक डाऊन होतं तर काम काय होतील ते स्वतः लॉकडाऊन होते, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. पाहा...
जळगाव : पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये जलद गतीने कामं करू शकलो नाही. मात्र आता कामं व्यवस्थित सुरू झाली आहेत. स्वातंत्र्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री सात महिन्यात पाच वेळा जळगाव जिल्ह्यात येणारी एकमेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळात सगळेच लॉकडाऊन आणि स्वतः उद्धव ठाकरे क्वारंटाईन होते, अशी टीका मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
Published on: Mar 12, 2023 10:19 AM
Latest Videos