विरोधकांचा सध्या फक्त एकच काम, माझ्यावर टीका करणं- गुलाबराव पाटील
Jalgoan Gulabrao Patil : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर टीका केली आहे. जातीय राजकारण अन् टीका टिपण्णी यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर थेट आरोप केलाय. पाहा...
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर टीका केली आहे. विरोधकांनी फक्त गुलाबराव पाटलांवर टीका करायचं काम सुरू केलंय, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणालेत. त्यांनी विरोधकांवर थेट आरोप केलाय. जळगाव तालुक्यातील वावडदा इथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचं उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यात ते बोलत होते. विरोधक आपल्यावर जातीपातीवरून टीका करत आहेत. तो आपल्या जातीचा आहे का? अशी टीका आपल्यावर होत असल्याचं त्यांनी सांगितलं. मी सर्वच जातीचा असल्याचं सांगत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय.
Published on: Mar 27, 2023 09:49 AM
Latest Videos