मी उद्धव ठाकरेंना तेव्हाच ‘ही’ वॉर्निंग दिली होती; गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य
Gulabrao Patil on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असताना त्यांना हात जोडून विनंती केली होती, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. पाहा व्हीडिओ...
जळगाव : शिवसेनेचे नेते, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आपल्यातला एक मराठा चेहरा आपल्यापासून लांब जात असून तो जाता कामा नये, हे उद्धव ठाकरेंना आधी समजावलं होतं. तसेच उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असताना हातपाय जोडून त्यांना विनंती देखील केली होती. मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने नागपूरपासून दादर पर्यंत सर्व गेले त्यामुळे मी एकटा राहिलो असतो तर मतदार संघाचा विकास करू शकलो नसतो. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना सोडून गेलो, असा पुनरुच्चार पुन्हा एकदा मंत्री गुलाबराव पाटलांनी जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.
Published on: Mar 12, 2023 08:21 AM
Latest Videos