मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कामावर भाजपच्या खासदाराची नाराजी; म्हणाले...

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कामावर भाजपच्या खासदाराची नाराजी; म्हणाले…

| Updated on: Apr 05, 2023 | 11:54 AM

Unmesh Patil on Gulabrao Patil : भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...

जळगाव : भाजपच्या खासदारांनी शिंदे गटाच्या मंत्र्याच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. जल जीवन मिशन योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमांना केंद्राचा प्रतिनिधी म्हणून प्रोटोकॉलने खासदार आणि जिल्ह्यातील भाजप नेते गिरीश महाजन यांना बोलवल्यास समाजामध्ये चांगला चित्र निर्माण होईल. जलजीवन मिशन योजनेला केंद्राने बजेट दिले त्यामुळे सर्वसमावेशक कार्यक्रम अपेक्षित आहे. त्याचा गैरसमज वैगरे दूर करायचं असेल आणि खरोखर ओके करायचं असेल तर योजनेचा कार्यक्रम सर्व समावेशक असणं आवश्यक आहे, असं म्हणत भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. मला बोलावलं नाही तरी चालेल. पण पाणी लोकांपर्यंत पोहोचायला हवं. पण असे सार्वजनिक कार्यक्रम सर्वसमावेशक असावेत, असं उन्मेश पाटील म्हणाले आहेत.

Published on: Apr 05, 2023 11:54 AM