बाप दाखवा नाहीतर श्राद्ध करा!; भाजप खासदाराचा उद्धव ठाकरे यांना इशारा

बाप दाखवा नाहीतर श्राद्ध करा!; भाजप खासदाराचा उद्धव ठाकरे यांना इशारा

| Updated on: Apr 05, 2023 | 11:34 AM

Unmesh Patil on Uddhav Thackeray : भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा व्हीडिओ...

जळगाव : भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचा दुतोंडीपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही. लोकांच्या भावनेशी हात घालून बाळासाहेबांच्या नावाने जयजयकार करणं बंद करा. स्वतःचं कतृत्व दाखवा. बाप दाखवा नाहीतर श्राद्ध करा!, असं उन्मेश पाटील यांनी म्हटलं आहे. जळगवामध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. साधूसंतांना मारहाण होत असताना तुम्ही गप्प का होता?, असा सवालही उन्मेश पाटील यांनी विचारला आहे. कोरोना काळात रसत्यावर न उतरता उध्दव ठाकरे घरात होते. त्यांनी लोकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले नाहीत. महिलेला झालेल्या मारहाणीवरून देवेंद्र फडणवीसांना राजीनामा मागणे चुकीचं आहे, असंही ते म्हणालेत.

Published on: Apr 05, 2023 11:32 AM