संजय राऊत माझ्यावर बोलले तर मी सभेत घुसेल-गुलाबराव पाटील
Gulabrao Patil On Sanjay Raut : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांना थेट इशारा दिलाय. पाहा व्हीडिओ...
जळगाव : राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना इशारा दिलाय. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत माजी आमदार स्वर्गीय आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरासाठी येत असतील तर त्यांचं स्वागत आहे. पण सभेत सभेत त्यांनी चौकटीत बोलावं. संजय राऊत सारखा माणूस माझ्यावर बोलत असेल तर मी सभेत घुसेल, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे 23 एप्रिल रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. माजी आमदार स्वर्गीय आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जळगावमध्ये असणार आहेत. त्यावर गुलाबराव पाटील बोलले आहेत. ठाकरे आणि राऊतांचं स्वागत मात्र त्यांनी चौकटीत बोलावं. अन्यथा राऊत माझ्यावर बोलले तर मी सभेत घुसेल, असा थेट इशाराच मंत्री गुलाबराव पाटलांनी दिला आहे.
Published on: Apr 20, 2023 09:52 AM
Latest Videos