Video : गुलाबराव पाटलांचं भाषण सुरु होतं, लाईट गेली; मग मोबाईलच्या टॉर्चमध्ये भाषण…
Jalgoan News : मंत्री गुलाबराव पाटलांच्या कार्यक्रमात बत्ती गुल! गुलाबराव पाटील भाषण करत असतानाच बत्ती गुल झाल्याने लोकांनी मोबाईलचा टॉर्च लावून कार्यक्रमात पार पाडला. बत्ती गुल झाल्याने गुलाबराव पाटलांनी मोबाईलच्या टॉर्चमध्येच भाषण केलं.
जळगाव : जळगावमधील कंडारी गावात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचं भूमिपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमात गुलाबराव पाटील भाषण करायला उभे राहिले. त्यांचं भाषण रंगात आलं होतं. इतक्यातच लाईट गेली. आता भाषण सुरू असतानाच बत्ती गुल झाल्याने एकच गोंधळ उडाला. उपस्थितांना प्रश्न पडला की, आता करायचं काय?पण मग पटापट मोबाईलच्या लाईट्स लावल्या गेल्या अन् या लाईटच्या प्रकाशात कार्यक्रम तसाच सुरू झाला. अन् मोबाईलच्या टॉर्चमध्ये गुलाबराव पाटलांनी भाषण केलं. बत्ती गुल झाल्याने गुलाबरावांनी मोबाईलच्या टॉर्चमध्ये भाषण केलं अन् याची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Published on: Apr 05, 2023 09:43 AM
Latest Videos