जम्मू काश्मीरमध्ये मला हे साध्य करायचंय; कोसळत्या बर्फात राहुल गांधी यांचं भाषण
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज समारोप झाला. या समारोपाच्या जनसभेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संबोधित केलं. पाहा राहुल काय म्हणाले...
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज समारोप झाला. 145 दिवसांच्या प्रवासानंतर आज या यात्रेचा समारोप झाला. या समारोपाच्या जनसभेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संबोधित केलं. या जनसभेत बोलताना राहुल गांधी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. या भाषणादरम्यान त्यांनी इंदिरा गांधी यांच्या बाबतचा किस्सा सांगितला. तेव्हा ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. ‘नफरतों के बाजार में मोहब्बत की दुकान खोलने की कोशिश की’, हा उल्लेख राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केला. या भाषणावेळी सभास्थळी बर्फ कोसळत होता. श्रीनगरच्या शेर-ए- काश्मीर स्टेडियममध्ये जनसभा झाली. या जनसभेत प्रियांका गांधी यांनीही उपस्थितांना संबोधित केलं. पाहा व्हीडिओ…
Published on: Jan 30, 2023 02:11 PM
Latest Videos